Home ताज्या घडामोडी Asha Bhosle : आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील कारर्कीद, पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरव

Asha Bhosle : आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील कारर्कीद, पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरव

Asha Bhosle : आशा भोसले यांची संगीत क्षेत्रातील कारर्कीद, पद्मविभूषण ते महाराष्ट्र भूषण पुरस्कारांनी गौरव
Asha bhosle Musical Journey

मुंबई : भारतीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध पार्श्वगायिका गायिका आशा भोसले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शनिवारी ह्दयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज म्हणजेच १२ एप्रिल २०२६ रोजी त्यांचं दुःखद निधन झालं.

आशाताईंच्या निधनानंतर देशभरातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांची गाणी अजरामर आहेत, आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर आशा भोसलेंना राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे. महाराष्ट्र सरकारनेही त्यांना महाराष्ट्र भूषण पूरस्कार देऊन गौरविले आहे.

राष्ट्रीय फिल्म पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका) या पुरस्कारानेही आशा भोसलेंचा सन्मान करण्यात आला होता. १९८१ आणि १९८६ मध्ये त्यांना हा सन्मान मिळाला. याबरोबरच आशा भोसले यांना फिल्मफेयर पुरस्कार (सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका) म्हणून देखील गौरविण्यात आलं आहे.

आशा भोसलेंना १९९६ मध्ये  जॅकी श्रॉफ आणि उर्मिला मांतोडकर यांच्या प्रचंड गाजलेल्या “रंगीला” सिनेमासाठीही स्पेशल फिल्मफेयर अवॉर्ड मिळाला होता.

तसेच, २००० मध्ये सिनेसृष्टीतील सर्वात मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कारने आशा भोसलेंचा गौरव करण्यात आला. यानंतर २००१ मध्ये फिल्मफेयर लाइफटाइम अचीवमेंट अवॉर्डनेही त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.

https://prahaar.in/2026/04/12/asha-bhosle-the-very-song-that-was-banned-earned-her-an-award/

आशा भोसले यांना २००२ मध्ये “लगान” सिनेमातील “राधा कैसे न जले” या गाण्यासाठी IIFA Awards (सर्वश्रेष्ठ महिला पार्श्वगायिका) या पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं होत. तसेच, नाइटिंगेल ऑफ एशिया अवॉर्ड १९८७ नेही त्यांचा सन्मान करण्यात आला. सिंगर ऑफ द मिलेनियम २०००(दुबई) आणि BBC लाइफटाइम अ‍ॅचिव्हमेंट अवॉर्डनेही आशाताईंचा २००२ मध्ये गौरव करण्यात आला होता.

आशा भोसले यांना भारत सरकारकडून २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. तर, महाराष्ट्र सरकारनं २४ मार्च २०२३ रोजी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आशा भोसलेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.