Home ब्रेकिंग न्यूज Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये…..

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये…..

Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार; कामशेतमध्ये दुकानाच्या चेंजिंग रूममध्ये…..
kamshet police station

पुणे : पुणे जिल्ह्यातील कामशेत परिसरात दुकानांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. एका कपड्यांच्या दुकानातील चेंजिंग रूममध्ये छुप्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरा लावून महिलेचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे.

https://prahaar.in/2026/03/07/a-young-man-committed-obscene-act-outside-the-college-22-year-old-youth-detained/

चेंजिंग रूममध्ये कॅमेरा

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला खरेदीसाठी मुकेश फॅन्सी कॉर्नर या दुकानात खरेदीसाठी गेली होती. यावेळी दुकान मालक मुकेश मुथा याने दुकानाच्या स्टोअर रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे, हे माहिती असतानाही पीडितेस तिथे कपडे बदलण्यासाठी पाठवले.  हा कॅमेरा दुकानदारानेच महिलांचे कपडे बदलण्याचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी ठेवला होता.

संशय आल्यावर प्रकार उघड

एका महिलेला कपडे बदलताना काहीतरी संशयास्पद असल्याची जाणीव झाल्यानंतर महिलेने दुकानदाराला जाब विचारला. मात्र, आरोपीने उलट तिच्यावर गप्प राहण्याचा दबाव टाकत तिला धमकावण्यावचा प्रयत्न केला.

https://prahaar.in/2026/03/05/pune-crime-sanams-death-at-a-birthday-party-a-mans-heart-was-found-in-the-body-this-thrilling-case-in-pune-remains-a-mystery-even-after-13-years/

घटनेनंतर पीडित महिलेने न घाबरता थेट कामशेत पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी तत्काळ कारवाई सुरू करून. कामशेत पोलिसांनी आरोपी मुकेश मुथा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असून आणखी महिलांचे व्हिडीओ फोटो त्याच्याकडे आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.