Home ताज्या घडामोडी Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या ‘या’ प्रसिद्ध गाण्यावर थिरकला

Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या ‘या’ प्रसिद्ध गाण्यावर थिरकला

Nick Jonas : बॉलिवूडच्या गाण्याची निक जोनसला भूरळ, पत्नी प्रियांका नव्हे तर माधुरीच्या ‘या’ प्रसिद्ध गाण्यावर थिरकला
Nick Jonas enjoying Bollywood song

मुंबई : भारतीय सिनेसृष्टी जगभरात प्रसिद्ध असून बॉलिवूडच्या सिनेमांसोबतच गाण्यांनाही जगभरात पंसती मिळते. यापैकीच बॉलिवूडचा चाहता असलेला अमेरिकन पॉप स्टार आणि बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा नवरा निक जोनस यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये निक त्याची पत्नी प्रियांका चोप्रा आणि त्याच्या भावांसोबत बॉलिवूड गाण्यांवर नाचताना दिसत आहे. मात्र, यामध्ये निक प्रियांका नाही तर अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या गाण्यावर थिरकत आहे.

या व्हिडिओत ‘पुकार’ सिनेमातील ‘के सरा सरा’ हे प्रसिद्ध गाणं वाजत आहे, जे माधुरी दीक्षित आणि प्रभू देवा यांच्यावर चित्रित करण्यात आलं होतं. निकनं या व्हिडिओला ‘आपल्या हृदयाचे ऐका’ असं कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Nick Jonas (@nickjonas)

निक जोनासचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून निकनं बॉलिवूड गाण्यांबद्दलचं आपलं प्रेम व्यक्त करण्याची ही पहिली वेळ नाहीये. याआधीही त्यानं एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो, त्याची पत्नी प्रियांका चोप्रा आणि त्याचे भाऊ केविन जोनास व जो जोनास ‘कुर्बानी’ सिनेमातील ‘आप जैसा कोई’ या हिट गाण्यावर नाचताना दिसत होते. या व्हिडिओमधील चौघांच्या उत्साहानं चाहत्यांचं पुरेपूर मनोरंजन केले.

https://prahaar.in/2026/04/10/sara-arjun-after-the-heroic-roar-now-sara-arjun-will-realize-this-tremendous-role/

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस सतत चर्चेत असतात. सध्या निकने शेअर केलेल्या या व्हिडिओनं भारतीय चाहत्यांची मने जिंकली आहेत.