Home ब्रेकिंग न्यूज Metro-3 ‘Aqua Line’ : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

Metro-3 ‘Aqua Line’ : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

Metro-3 ‘Aqua Line’ : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार
Aqua Line

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक मोठे गिफ्ट दिले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ आणि खिशाला परवडणारा करण्यासाठी विशेष सवलतीच्या पासची घोषणा केली आहे. ‘डिजिटल मोबिलिटी’ला चालना देण्यासाठी हे सर्व पास नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) वर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च आता २५ टक्क्यांनी कमी!

शाळा-महाविद्यालयाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मेट्रोने मोठा आधार दिला आहे. इयत्ता १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे सवलत लागू असेल

४५ आणि ६० ट्रिप पासवर २५% थेट सवलत

वैधता: ३० दिवस.

यामुळे विद्यार्थ्यांचा दरमहा प्रवासाचा खर्च लक्षणीयरीत्या कमी होणार असून सुरक्षित आणि वातानुकूलित प्रवासाची खात्री मिळणार आहे.

पर्यटकांच्या सेवेसाठी ‘अनलिमिटेड’ मेट्रो राईड

मुंबई फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यकांसाठी मेट्रोने खास ‘टुरिस्ट पास’ सादर केले आहेत. एकदा पास काढला की कितीही वेळा प्रवास करण्याची मुभा मिळणार आहे:

१ दिवसाचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त ₹२८०
३ दिवसांचा पास (अमर्यादित प्रवास): फक्त ₹७००

दिव्यांग आणि नियमित प्रवाशांनाही लाभ

केवळ विद्यार्थीच नव्हे, तर दिव्यांग प्रवाशांनाही ४५ आणि ६० ट्रिप पासवर २५% सवलत कायम ठेवण्यात आली आहे. तसेच, नियमित नोकरदार वर्गासाठी MetroConnect3 अॅपवर ४५ ट्रिपसाठी १०% आणि ६० ट्रिपसाठी १५% सवलत आता NCMC कार्डच्या माध्यमातून घेता येईल.