Home ताज्या घडामोडी Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं ‘हे’ कोट्यवधींच सरप्राइज

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं ‘हे’ कोट्यवधींच सरप्राइज

Rashmika-Vijay Reception : कुर्गमध्ये पार पडला रश्मिका-विजयचा दुसरा ग्रँड रिसेप्शन सोहळा, रश्मिकाला मिळालं ‘हे’ कोट्यवधींच सरप्राइज
Rashmika and Vijay Reception in kurg

साऊथबरोबरच संपूर्ण देशात प्रसिद्ध असलेली जोडी म्हणजेच अभिनेता विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची क्रेझ काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. त्यांच्या लग्नातील अनसीन फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.

२६ फेब्रुवारीला राजस्थानच्या उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर आता जवळपास महिन्याभरानं या कपल्सनं रश्मिकाचं होमटाऊन कूर्गमध्ये एक ग्रँड रिसेप्शन दिलं. या सोहळ्यात केवळ रश्मिकाच्या सौंदर्याचीच नाही, तर तिच्या वडिलांनी दिलेल्या एका आलिशान भेटीचीही जोरदार चर्चा रंगली आहे.

६ एप्रिल रोजी विराजपेटच्या सेरेनिटी हॉलमध्ये पार पडलेल्या या सोहळ्यासाठी या जोडप्यानं अतिशय हटके मात्र, तितकाच पारंपारिक पेहराव केला होता. यावेळी रश्मिका अस्सल कूर्गी अंदाजात सजली होती. तिनं मेहंदी आणि गडद गुलाबी रंगाची कांजिवरम सिल्क साडी नेसली होती. विशेष म्हणजे, ही साडी तिने खास कोडवा स्टाईलनं म्हणजेच कूर्गच्या परंपरेनुसार नेसली होती.

तर, विजय देवरकोंडानं पांढरा शर्ट, ब्लॅक ट्राउझर आणि चंदेरी नक्षीकाम असलेला ब्लेझर परिधान करून रेट्रो स्टाईल लूक कॅरी केला होता. यावेळी स्टेजवर रश्मिका लाडात येऊन विजयचे केस नीट करताना दिसली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या रिसेप्शनमधील सर्वात मोठ आकर्षण ठरलं ते म्हणजे रश्मिकाच्या वडिलांनी आपल्या लेकीला दिलेलं अनोखं गिफ्ट. माहितीनुसार, रश्मिकाच्या वडिलांनी रश्मिकाला लग्नाची भेट म्हणून कूर्गमध्येच एक अतिशय महागडा आणि आलिशान बंगला भेट दिला आहे. या बंगल्याची किंमत करोडोंच्या घरात असून, आपल्या लेकीचं कौतुक करण्यासाठी वडिलांनी दिलेली ही भेट पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.

या सोहळ्यात अभिनेता विजयनं माईक हातात घेताच उपस्थित पाहुण्यांची मनं जिंकली. तो गंमतीने म्हणाला, “कूर्गच्या मुली खरोखरच खूप सुंदर असतात आणि मी खूप नशीबवान आहे की माझं लग्न इथल्याच एका सुंदर मुलीशी झालंय.” विजयच्या या विधानावर रश्मिकाही लाजली. रश्मिका आणि विजयाच्या या सोहळ्याचे फोटोही जोरदार व्हायरल होत आहेत.