पाटणा : बिहारची राजधानी पाटणामध्ये नात्याला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. परसा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३ वर्षांच्या चिमुकलीवर तिच्या सख्ख्या काकाने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या अघोरी कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून तिच्यावर पाटणा येथील ‘एम्स’ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन नराधम आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मात्र, यातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
https://prahaar.in/2026/04/06/green-asha-indian-ship-indias-eighth-ship-safely-leaves-the-strait-of-hormuz-carrying-20000-tonnes-of-lpg/
आईशेजारी झोपलेल्या ३ वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून…
नशेत धुंद काकाचा नराधम अवतार…
पीडित मुलीच्या आईने सांगितलं की, मुलगी रात्री घरामध्ये झोपली होती. त्यावेळी तिचा नशेच्या आहारी गेलेला काका घरी आला. त्याने मुलीला उचलून नेले. घरापासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन शेतात नेऊन त्याने आपल्या दोन मित्रांसह या निष्पाप बालिकेवर सामूहिक अत्याचार केला. सुदैवाने, जवळच असलेल्या मत्स्यपालन तलावावर राखण करणाऱ्या एका व्यक्तीने चिमुकलीच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि आरडाओरडा सुरू केला. पकडले जाण्याच्या भीतीने नराधम आरोपी पीडितेला तिथेच सोडून पळून गेले. इकडे आईला जाग आली तेव्हा मुलगी गायब असल्याचे पाहून तिने टाहो फोडला. शोधाशोध केली असता मुलगी रक्ताळलेल्या अवस्थेत शेतात सापडली. पोलिसांनी या प्रकरणी पोक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. एका फरार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.