Home ब्रेकिंग न्यूज Baramati Assembly by-election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज

Baramati Assembly by-election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज

0
Baramati Assembly by-election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज
sunetra pawar

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी आज म्हणजेच सोमवार ६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या स्मृतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

काय म्हणाल्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ?

यावेळी अजितदादांच्या आठवणीने त्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले त्या भावूक होत म्हणाल्या की, “२ महिन्यांपूर्वी आम्ही लाडक्या नेत्याला गमावले. बारामती पोटनिवडणुकीचा अर्ज मी दाखल करत आहे. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की दादा आज नाहीत हे मला आजही मान्य नाही, पण नियतीने हा काळ आणला आहे. बारामतीकरांची सेवा करणे म्हणजे दादांच्या विश्वासाचा आधार होता. बारामती हा दादांचा श्वास होता, त्यामुळे त्यांचा अखेरचा श्वासही बारामतीच्या मातीत राहिला.”

त्यांनी सांगितले की बारामतीतील प्रत्येक झाड, पान, फुल, रस्ते, शाळा, नदी आणि इमारतींमध्ये अजित पवारांचा स्पर्श आहे. सदस्यतेसाठी अर्ज दाखल करताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “तुमचं प्रेम, पाठिंबा आणि साथ हीच माझी शक्ती आहे. गेल्या ३५-३६ वर्षांत अजितदादांना बारामतीकरांनी प्रचंड मताधिक्याने निवडून दिलं. आजची निवडणूक दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी आहे.” बारामती पोटनिवडणूक राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण ठरत असून, सर्व पक्ष आणि मतदार या निवडणुकीकडे लक्ष ठेवून आहेत. सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या बारामतीशी असलेल्या घट्ट नात्यावर बद्दल सांगितले, त्या म्हणाल्या की, “प्रत्येक बारामतीकर हा दादांसाठी पांडुरंग होता आणि दादांसाठी बारामती श्वास होती.” म्हणून त्यांचा अखेरचा श्वासदेखील बारामतीच्या मातीत विसावला, असे सांगतनाच सुनित्रा पवार यांना गहिवरुन आले. दादाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि बारामतीचा विकास करण्यासाछी मी माझे दुःख तळघरात कोंडून अत्यंत धीराने आपल्या सर्वांसाठी बाहेर पडले हा धीर बारामतीकरांकडे बघूनच आला आहे. तुमची साथ ही माझी शक्ती आहे.