पुणे : पावसाने गुरुवारी पुणे शहर अक्षरशः तुंबले, रस्ते पाण्याखाली गेले. घरांत, दुकानात पाणी शिरले आणि एका ज्येष्ठ महिलेचा बळी गेला. त्यामुळे महापालिकेचे नियोजन कोलमडल्याचे चित्र समोर आले. त्यानंतर आज पुणे महापालिकेत आपत्ती व्यवस्थापन विभागासह अन्य विभागांची तातडीची बैठक घेण्यात आली. कामात सुधारणा करण्यासाठी प्रशासनाला कंबर कसण्याचे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले आहेत.