पंढरपूर : पंढरपूर शहरात पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सरगम चौक परिसरात एका कारमधून तब्बल ३ किलो ९०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेमकी घटना काय?
या प्रकरणी पोलिसांनी कारचालक माणिक चौगुले याला ताब्यात घेतले आहे. ही धडक कारवाई पंढरपूर पोलिसांच्या वतीने करण्यात आली असून, “शहरातील अवैध धंद्यांविरुद्ध अशीच कडक मोहीम सुरू राहील,” अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली.