Home ताज्या घडामोडी Dhurandhar 2 : अभिनेत्री अमिषा पटेलनं धुरंधर २ सिनेमाचं केलं कौतुक, बॉलिवूड इडंस्ट्रीला दिला ‘हा’ सल्ला

Dhurandhar 2 : अभिनेत्री अमिषा पटेलनं धुरंधर २ सिनेमाचं केलं कौतुक, बॉलिवूड इडंस्ट्रीला दिला ‘हा’ सल्ला

Dhurandhar 2 : अभिनेत्री अमिषा पटेलनं धुरंधर २ सिनेमाचं केलं कौतुक, बॉलिवूड इडंस्ट्रीला दिला ‘हा’ सल्ला

मुंबई – धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांपासून अनेक कलाकारांनी या सिनेमाचं भरभरून कौतुक केलं आहे. यामध्ये आता आणखीन एका अभिनेत्रीची भर पडली असून या अभिनेत्रीनं रणवीरच्या धुरंधर सिनेमाला डोळे उघडणारा सिनेमा म्हणत सिनेमाचं जोरदार कौतुक केलं आहे.

तिने सिनेमामध्ये इन्फ्लुएन्सर्सना कास्ट करण्याबाबतही आपलं मतं व्यक्त केलं आहे. धुरंधर २ सिनेमाचं कौतुक करत बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेलनं आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

या पोस्टमध्ये अमिषानं लिहिलं आहे की “डोळे उघडणारी गोष्ट. इंडस्ट्री धुरंधरची प्रशंसा करत आहे, सिनेमा प्रशंसेस पात्र आहे. इंडस्ट्रीनं हे लक्षात घ्यायला हवं की आदित्य धरने एक प्रोजेक्ट नाही, तर एक सिनेमा बनवला आहे. त्याने कलाकारांना कास्ट केलं आहे, पार्ट्यांमध्ये ट्रेंड होणाऱ्या इन्स्टाग्रामर्सना नाही. प्रोजेक्ट्स बनवणं थांबवा आणि सिनेमा बनवायला सुरुवात करा.”

धुरंधर २ सिनेमा १९ मार्च २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच धुरंधर २ सिनेमानं जगभरात धूमाकूळ घातलाय. प्रदर्शित झाल्यापासून धुरंधर २ हा सिनेमा उत्तम कमाई करत असून अवघ्या सहा दिवसांत या सिनेमानं ९०० कोटींचा टप्पा पार केला आहे. जगभरात धुरंधर २ ची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे.