Home ताज्या घडामोडी अभिनेता सनी देओलच्या पोस्टवर चक्क पाकिस्तानी चाहत्याची कमेन्ट; म्हणाला…

अभिनेता सनी देओलच्या पोस्टवर चक्क पाकिस्तानी चाहत्याची कमेन्ट; म्हणाला…

0
अभिनेता सनी देओलच्या पोस्टवर चक्क पाकिस्तानी चाहत्याची कमेन्ट; म्हणाला…

अभिनेता सनी देओल सध्या बॉर्डर २ मुळे चांगलाच चर्चेत असून नुकताच नेटफ्लिक्सवर बॉर्डर २ सिनेमा रिलीज झाला. तसेच, अभिनेता धर्मेंद्र यांच्या निधनाच्या ३ महिन्यानंतर आता सनी देओलनं सोशल मिडियावर आपल्या आईसोबत एक सुंदर असा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबतच अभिनेता सनी देओलनं आई असं लिहून त्यापुढे अनेक हार्ट इमोजीस असलेलं ह्द्यस्पर्शी असं कॅप्शन दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sunny Deol (@iamsunnydeol)

सनी देओलनं शेअर केलेला हा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हयरल होत असून या फोटोवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. तर, चक्क एका पाकिस्तानी चाहत्याने हा फोटो लाईक केला असून ‘तुमच्या आईबद्दल प्रेम आणि आदर पाकिस्तानातून’ अशी सुंदर कमेन्ट सनी देओलनं शेअर केलेल्या या फोटोवर केली आहे.