मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आदेशानंतर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी शुक्रवारी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन आपला राजीनामा सोपवला. सुनेत्रा पवार यांनी हा राजीनामा स्वीकारला असून, आता तो औपचारिक मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.
https://prahaar.in/2026/03/20/cm-fadnavis-orders-rupali-chakankar-to-resign-orders-issued-after-few-video-goes-viral/
नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे नाव आल्यापासून राजकीय वातावरण तापले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजीनाम्याचे आदेश दिल्यानंतर चाकणकर तातडीने उपमुख्यमंत्र्यांच्या ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाल्या. या भेटीत चाकणकर यांनी प्रकरणाबाबत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला; मात्र प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता दबाव पाहता, पक्ष आणि सरकारची प्रतिमा जपण्यासाठी त्यांचा राजीनामा घेण्याचा निर्णय सुनेत्रा पवार यांनी घेतला.
https://prahaar.in/2026/03/20/resign-chief-minister-orders-rupali-chakankar/
सुनेत्रा पवार यांनी स्वीकारलेला हा राजीनामा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत राज्यपालांकडे पाठवला जाईल. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर रुपाली चाकणकर यांचा राजीनामा अधिकृतपणे मंजूर होईल.
