कटक : ओडिशातील कटकच्या सरकारी एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये सोमवारी पहाटे आग लागली. रुग्णालयाच्या आयसीयूला आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत १० रुग्णांचा मृत्यू झाला आणि रुग्णालयाचे ११ कर्मचारी जखमी झाले. ही घटना रुग्णालयाच्या ट्रॉमा केअर विभागातील आयसीयूमध्ये पहाटे २:३० ते ३:०० च्या दरम्यान घडली. ज्या आयसीयूला आग लागती त्यात गंभीर स्थितीत असलेलेल्या रुग्णांवर उपचार सुरू होते.
#WATCH | Odisha: A fire broke out at Trauma Care ICU of S.C.B. Medical College and Hospital in Cuttack. Fire brigade present at the spot for firefighting operations. Visuals from the spot. More details awaited. pic.twitter.com/KZVF5wOy4V
— ANI (@ANI) March 16, 2026
आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. अथक परिश्रमांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. रुग्णालयातील अनेक रुग्णांना तसेच त्यांचा नातलगांना आणि रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले आहे. आग प्रकरणी चौकशी होणार असून दोषींवर कारवाई केली जाणार आहे.
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि आरोग्यमंत्री मुकेश महालिंग यांनी रुग्णालयात येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. एकूण २३ रुग्णांना इतर विभागात हलवण्यात आले होते, त्यापैकी सात जणांचा हलवताना मृत्यू झाला, तर तीन जणांचा नंतर मृत्यू झाला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्राथमिक तपासात आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे दिसून आले आहे. पण तज्ज्ञांच्या सहकार्याने आग प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांना २५ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.