Home ब्रेकिंग न्यूज मुंबईतील सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत तीन प्रभाग भाजपकडे

मुंबईतील सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत तीन प्रभाग भाजपकडे

मुंबईतील सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुकीत तीन प्रभाग भाजपकडे

मुंबई : मुंबई महापालिकेच्या १७ प्रभाग समित्यांच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात सहा समित्यांच्या निवडणूका गुरुवारी पार पडल्यानंतर शुक्रवारी आणखी सहा प्रभाग समित्यांच्या निवडणूका पार पडल्या. या सहा निवडणुकीत उबाठाचे दोन, मनसे एक आणि भाजपचे तीन अध्यक्ष निवडून आले आहे.

मुंबई महापालिकेच्या पी दक्षिण’, जी दक्षिण प्रभाग समिती , के उत्तर आणि के दक्षिण’ प्रभाग समिती, जी उत्तर प्रभाग समिती, ‘के पश्चिम’ प्रभाग समिती , एच पूर्व व एच पश्चिम प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या. यातील तीन प्रभागांमध्ये महापौर रितू तावडे तर तीन प्रभागांमध्ये उपमहापौर संजय घाडी यांनी पिठासीन अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.

जी उत्तर प्रभाग समिती अध्‍यक्षपदी यशवंत किल्लेदार

जी उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उबाठाचे उमेदवार जोसेफ कोळी यांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे मनसेचे उमेदवार यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली.

या प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जोसेफ कोळी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यशवंत किल्लेदार या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अध्यक्ष पद निवडणूक प्रसंगी, अर्ज मागे घेण्याच्या विहित वेळेत जोसेफ कोळी यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे यशवंत किल्लेदार यांची प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

पी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदी श्रीकला पिल्ले

पी दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या श्रीकला रामचंद्रन पिल्ले यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

एच पूर्व व एच पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदी रोहिणी कांबळे

एच पूर्व व एच पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उबाठाच्या उमेदवार रोहिणी कांबळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

के पश्चिम’ प्रभाग समिती अध्यक्षपदी रोहन राठोड

के पश्चिम प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रोहन राठोड यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

जी दक्षिण प्रभाग समिती अध्‍यक्षपदी पद्मजा चेंबूरकर

जी दक्षिण प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उबाठाच्या उमेदवार पद्मजा चेंबूरकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

के उत्तर आणि के दक्षिण प्रभाग समितीवर प्रकाश मुसळे

‘के उत्तर आणि के दक्षिण’ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे प्रकाश दौलत मुसळे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

प्रभाग समिती अध्यक्षांची निवड

पी दक्षिण’ प्रभाग : भाजप नगरसेविका श्रीकला रामचंद्रन पिल्ले

जी दक्षिण प्रभाग समिती : उबाठा नगरसेविका पद्मजा चेंबूरकर

के उत्तर आणि के दक्षिण’ प्रभाग समिती : भाजप नगरसेवक प्रकाश दौलत मुसळे

जी उत्तर प्रभाग समिती : मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार

‘के पश्चिम’ प्रभाग समिती : भाजप नगरसेवक रोहन राठोड

एच पूर्व व एच पश्चिम प्रभाग समिती : उबाठा नगरसेविका रोहिणी कांबळे