डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. घटनेची माहिती मिळताच तंत्रज्ञांचे पथक दुरुस्तीसाठी घटनास्थळी पोहोचले. एमआयडीसीचे पथक दुरुस्तीचे काम करत आहे. पण दुरुस्तीला वेळ लागण्याची शक्यता विचारात घेता पुढील एक – दोन दिवस डोंबिवलीकरांना पाण्याचा जपून वापर करावा लागण्याची शक्यता आहे.