Home क्रीडा India vs Pakistan : पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय

India vs Pakistan : पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय

0
India vs Pakistan : पाकिस्तानचा गोलंदाजीचा निर्णय

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप २०२६ मध्ये आज म्हणजेच रविवार १५ फेब्रुवारी रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजल्यापासून हाय व्होल्टेज भारत – पाकिस्तान सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी नाणेफेक भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता झाली. नाणेफेकीचा कौल पाकिस्तानच्या बाजूने लागला. पाकिस्तानने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.

श्रीलंकेत कोलंबो येथे आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत – पाकिस्तान सामना होणार आहे. प्रेमदासाची खेळपट्टी फिरकीला अनुकूल आहे. त्यामुळे या सामन्यात भारत किती मोठी धावसंख्या उभारणार यावरून तर्कवितर्क सुरू आहेत.

हस्तांदोलन नाहीच

पाकिस्तान पुरस्कृत अतिरेकी कारवायांचा निषेध म्हणून भारतीय क्रिकेटपटूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंसोबत हस्तांदोलन करणे टाळले.

अंतिम ११ खेळाडू : 

भारत : अभिषेक शर्मा , इशान किशन (यष्टीरक्षक) , तिलक वर्मा , सूर्यकुमार यादव (कर्णधार) , हार्दिक पांड्या , शिवम दुबे , रिंकू सिंग , अक्षर पटेल , कुलदीप यादव , वरुण चक्रवर्ती , जसप्रीत बुमराह
पाकिस्तान : सईम अयुब , साहिबजादा फरहान , सलमान आगा (कर्णधार) , बाबर आझम , उस्मान खान (यष्टीरक्षक) , शादाब खान , मोहम्मद नवाज , फहीम अशरफ , शाहीन आफ्रिदी , अबरार अहमद , उस्मान तारिक