कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये ओमान विरूद्धच्या सामन्यात आयर्लंडचा प्रभारी कर्णधार लॉर्कन टकरने ५१ चेंडूत चार षटकार आणि दहा चौकार मारत नाबाद ९४ धावा केल्या. टकरच्या वादळी खेळीमुळे ओमानने २० षटकांत पाच बाद २३५ धावा केल्या तर ओमानचा डाव १८ षटकांत १३९ धावांत आटोपला. आयर्लंडने सामना ९६ धावांनी जिंकला तसेच धावगती सुधारत ब गटात चौथे स्थान पटकावले.
https://prahaar.in/2026/02/14/ireland-won-by-96-runs/
टकरने ओमान विरुद्ध १८४.३१ च्या स्ट्राईक रेटने खेळत चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली तसेच नव्या विक्रमांची नोंद केली. त्याने पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. या यादीत ९८ धावा करत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल पहिल्या तर टकर नाबाद ९४ धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. यादीत तिसऱ्या स्थानी भारताचा रोहित शर्मा आहे. रोहितने २०२४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावा केल्या होत्या. यादीत चौथ्या स्थानी पुन्हा विंडीजचा गेल आहे. त्याने २००९ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८८ धावा केल्या होत्या. या यादीत पाचव्या स्थानी न्यूझीलंडचा केन विलियमसन आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२१ मध्ये ८५ धावा केल्या होत्या.
https://prahaar.in/2026/02/14/england-beat-scotland-with-10-balls-to-spare/
आयर्लंडकडून पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रमही लॉर्कन टकरच्या नावावर आहे. याआधीही हा विक्रम त्याच्याच नावावर होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या २०२२ च्या सामन्यात ७१ धावा केल्या होत्या.