मोहमद अली मार्गावरील अनधिकृत फेरीवाल्यांसह पदपथावरील वाढीव बांधकामांवर हातोडा
मुंबई : मुंबईतील अलेक भागांमधील फेरीवाल्यांसह अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आल्यानंतर हिंमत असेल तर भेंडीबाजार, मोहमद अली रोडवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करून दाखवा असे महापालिकेला सुनावणाऱ्या मुंबईकरांना आज महापालिकेने तिथेही कारवाई करून आम्ही मनात आणले तर कुठेही कारवाई करू शकतो हे दाखवून दिले आहे. मुंबई महापालिकेच्या बी विभागाच्यावतीने अत्यंत गजबजलेले व्यापारी रस्ते म्हणून ओळखल्या जाणा-या मोहम्मद अली मार्ग आणि इब्राहिम मर्चंट मार्ग परिसरातील पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांवर सोमवारी २ फेब्रुवारी रोजी कारवाई करण्यात आली.
मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांच्या निर्देशानुसार तसेच परिमंडळ एकच्या उपायुक्त पदी नियुक्त झालेल्या चंदा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बी विभागाच्या सहायक आयुक्त योगेश देसाई यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.मोहम्मद अली मार्ग हा भेंडीबाजार, मशीद बंदर आणि भायखळा परिसराला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. इब्राहिम मर्चंट मार्ग हा रस्ता नागदेवी आणि मांडवी परिसराच्या जवळ आहे. हे दोन्ही रस्ते व्यापारी दृष्टीने आणि रहदारीच्या दृष्टिने खूप महत्त्वाचे आहेत. या दोन्ही मार्गावरील पदपथांवर अनधिकृत वाढीव बांधकामे आढळून आली होती. तसेच, या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनीही दुकाने उभी केल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे, वाहनचालकांना मार्गक्रमण करण्यास तसेच पादचाऱयांना पदपथांवर चालण्यास अडथळा निर्माण होत होता.
याच पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेच्या ‘बी’ प्रशासकीय विभागाकडून निष्कासनाची मोहीम हाती घेण्यात आली. या अंतर्गत, या परिसरातील अनधिकृत फेरीवाले, पदपथांवरील अनधिकृत वाढीव बांधकामांचे निष्कासन करण्यात आले. ७ अनधिकृत दुकाने हटविण्यात आली. तसेच, १२ ओटे, पत्र्याचे लोखंडी शेड, १० बोलार्ड, २ बेवारस वाहनांवर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलनाची ०४ वाहने, ०२ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हटवण्यात आले. या कारवाईदरम्यान महानगरपालिकेचे ४० अधिकारी – कर्मचारी यांच्यासह पुरेसा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला होता. या कारवाईबद्दल स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. आगामी काळातही अनधिकृत / वाढीव बांधकामांविरोधात नियमितपणे कारवाई सुरूच राहील, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
चांगली कारवाई केली पण ही कायम स्वरूपात असेल तर बरं होईल
मुंबईतल्या सर्व फेरीवाल्यांचा बंदोबस्त करा लवकरात लवकर
अंधेरी पूर्व, साकीनाका इथे फुटपाथवर कढईत तळण चालू असत,लोकांना रस्त्यावरुन चालाव लागत,ह्या एरीयात कोणाचच लक्ष का नाही.
दादर रेल्वे स्थानक पश्चिम परिसरात फेरीवाले बसल्याने सर्वसामान्य नागरिकांना चालताना अडचणींचा सामना करावा लागतो
महानगरपालिकेची व्हॅन ऊभी असताना सुद्धा फेरीवाले धंदा लावून बसलेले असतात अधिकारी वर्गाचा वचक राहिलेला दिसत नाही अधिकारी बहुतेक वेळा त्यांना हटवून फोटो काढताना दिसतात आणि नंतर परत फेरीवाले पुर्ववत बसलेले दिसतात
आता ते का बसतात आणि त्यांना बसण्यापासुन रोखण्यासाठी महानगरपालिका उपाय करतील काय हे पहाणे गरजेचे आहे
ही कारवाई फक्त दिवसा नको रात्री पण झाली पाहिजे प्रत्येक तासात
हि कारवाई दिखावा असता कामा नये कायम सोरूपी मुंबईतील फुटपाथ मोकळे झाले पाहिजेत
तरच परप्रांतीय मुंबईतील घुसखोरी बंद होहील
मुलुंडला टी वॉर्ड च्या हद्दीत जवाहरलाल नेहरू रोड वर फेरीवाल्यानी पूर्ण फूट पाथ अडवून ठेवला आहे म्युनिसिपल ची गाडी आली की पळून जातात आणि गाडी गेली की लगेच परत बस्थान बसवतात. स्थानिक आणि दुकानदार खुप त्रस्त झाले आहेत. असा कुठला अधिकारी नाही का जो कायम चे हे सर्व बंद करून जनतेला चालायला रस्ता मोकळा करून देईल ?
संपूर्ण मुंबई भर कायमस्वरूपी कारवाई केली पाहिजे. तरच सगळे उपरे परप्रांतीय बांगलादेशी पळून जातील आणि मुंबई मोकळा श्वास घेईल. फुकटात जागा बळकावून बेकायदा धंदे करुन संपत्ती जमा करून मुंबईकरांच्या उरावर बसलेत
Ashich karwai sarva station chya purv paschim donhi bajula karne garjeche aahe BMC la lakh lakh shubhechha
महानगर पालिका अधिकाऱ्याचे अभिमानास्पद कामगिरी. अशीच कारवाई दादर स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांवर होईल का? महानगर पालिकेची गाडी गेल्यावर तेथे परत फेरीवाले असनस्थ होतात.
मुलुंड T ward ' पूर्व व पश्चिम रेल्वे स्थानका समोर बेकायदेशीर फेरीवाले फूटपाथवर अतिक्रमण करून बसले आहेत, याचा नागरिकांना खूप त्रास होतो. दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत आहेत अतिक्रमणे कायमची हटवली जातील अशी आशा आहे.
अभिनंदन…
अशीच कारवाई महाकाली अंधेरी पूर्व येथील होलीचर्च हाॅस्पिटल समोरील रस्त्याच्या दुतर्फा फुटपाथवर अनधिकृतरित्या बसलेले फेरीवाले तसेच केलेली बांधकामे ह्यावर होणे जरूरी आहे.
रोज सकाळी आणि संध्याकाळी सदर अनधिकृत व्यवहारामुळे वाहतुकीची कोंडी होणे,प्रदुषण आणि नागरिकांस तसेच शाळकरी मुलांस धोका पत्करून वाटचाल करावी लागते…
ई.विभागाच्या हद्दीतील मौलाना आझाद रोड या रोडवरून पुर्वी १६५.६८या बेस्ट बस चालत होत्या कालांतराने या रोडवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण करुन व तेथील स्थानिकांची वाहने भर रस्त्यात पार्किंग असल्यामुळे वाहतुकीस व पादचाऱ्यांना चालण्यास खुपच अडचण होत आहे या ठिकाणी सुध्दा अशीच कारवाई होईल का
अभेद्य किल्ल्यामध्ये भेद केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन अशीच कारवाई ज्या ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेले आहे त्या सर्व ठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने करावी हीच अपेक्षा
फक्त ही कारवाई क्षणिक न ठरो.
जर वरील निर्देशित अधिकारी त्या त्या विभागात असे चांगले कर्तव्य काम करीत असेल, तर ईतर वार्ड मधील अधिकाऱ्यांकडून अशीच अपेक्षित आहोत,त्या कामात कोणत्याही पोलिटिकल लिडरने ढवळाढवळ करू नये.
Kurala jari Mari madhye trapic che samshya aahe.andhikurth parking vadali aahe.tya warti those actions gyavi he namra vinanti.
छान कारवाई | अशी हिम्मत सगळ्आच वॉर्ड मध्ये सगळ्या अधिकाऱ्यांनी दाखवायला हवी | सुप्रीम कोर्टासारखे पगार थांबवण्याची वेळ येऊ नये |
Can u apply same punishment with the help of cc tv same like traffic violations.
छान काम टीम.
हे पी नॉर्थ वॉर्ड, मालाड स्टेशन परिसरातही लागू होईल का? येथे बेकायदेशीर फेरीवाले व दुकाने फूटपाथवर अतिक्रमण करून बसली आहेत, त्यामुळे गर्दीच्या वेळेत नागरिकांना चालायला जागा राहत नाही.
मालाड फिश मार्केटजवळ कपड्यांच्या विक्रेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आधीच शेड उभारली आहे. दररोज पालिकेची टेम्पो रुईया हॉल बस स्टॉपजवळ येते, पण संध्याकाळी ७ नंतर फेरीवाले पुन्हा रात्री १२ पर्यंत बसतात.
ही अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवली जातील अशी अपेक्षा आहे.
छान काम टीम Appreciated…
हे पी नॉर्थ वॉर्ड, मालाड स्टेशन परिसरातही लागू होईल का? येथे बेकायदेशीर फेरीवाले व दुकाने फूटपाथवर अतिक्रमण करून बसली आहेत, त्यामुळे गर्दीच्या वेळेत नागरिकांना चालायला जागा राहत नाही.
मालाड फिश मार्केटजवळ कपड्यांच्या विक्रेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांच्या समन्वयाने आधीच शेड उभारली आहे. दररोज पालिकेची टेम्पो रुईया हॉल बस स्टॉपजवळ येते, पण संध्याकाळी ७ नंतर फेरीवाले पुन्हा रात्री १२ पर्यंत बसतात.
ही अतिक्रमणे कायमस्वरूपी हटवली जातील अशी अपेक्षा आहे.
खुप छान.अशी कार्यवाही मद्धे सातत्य ठेवणे जरुरी आहे.तेव्हा अनधिकृत बांधकामांवर बंदी घालण्यात येईल. धन्यवाद.
लय छान। पण ह्या कार्यवाही मद्धे मुंबई आणि उपनगरांमध्ये सातत ठेवणे गरजेचे आहे. जेणेकरून रहदारीची वाट मोकळी हलवायला पाहिजे.तेव्हाच हे अनधिकृत बांधकाम कामावर लगाम लावता येईल आणि त्या लोकांचं माज उतरेल.धन्यवाद
रस्ता व फुटपाथ यावरचे अतिक्रमण काढण्याचे अधिकार पोलीसांना दिले पाहिजे,कारण रस्ता व फुटपाथ रहदारी सुरळीत करण्याचे काम ट्राफीक पोलीस करतात,वाहन उचलतात,पण फेरीवाले व टपर्या हटवण्याचे काम नपा करतात कधी कधी,ट्राफीक पोलीस रोजच असतात रहदारी सुरळीत करण्यासाठी,आपण गाडी पार्क केली की पोलीसच हटवतात मग फेरीवाले टपर्या चे अधिकार पोलीसांनाच द्यावे,आपण विचारु शकतो.
अनधिकृत फेरीवाले व बांधकामवर हातोडा महानगर पालिका अधिकारी यांनी आज गोरा खैरनार यांची आठवण जागी केली धन्यवाद
खूप छान काम केले मॅडम..
महावीर नगर कांदिवली (पश्चिम)
या भागात पण संध्याकाळी प्रचंड गर्दी होते,
येथे पण कारवाई करण्यात यावी..
आता पर्यंत शिवसेनेचे कारभारी होते त्या मुळे कोणी लक्ष देत नव्हते
पुन्हा दोन महिन्यात अतिक्रमण केल्यास दंड आकारून कारवाई करण्यात येणार का ?
हे सर्व रहदारी च्या रस्त्यावर करणे आवश्यक आहे यात सातत्याने कारवाई केली जाईल याची वरिष्ठांनी दक्षता घ्या
आदरणीय आयुक्त मॅडम, अतिशय उत्तम कामगिरी आहे. अशीच कारवाई स्टेशनं रोड, बोरिवली पश्चिम येथे झाली तर फार बरे होईल.
Great, this is duty of civic body &they should fearlessly perform their duties, commom people must always support them
अनाधिकृत असेलतर तोडलच पाहिजे आणि सोबतच ते अनधिकृत काम करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून शिक्षा पण झाली पाहिजे. फक्त सामान जप्त करून उपयोगाचे नाही
हे असेच चालू ठेवा महिन्यातून एक तरी फेरी ठेवा, ह्यांच्या वाह्यातपणामुळे/मजुर्देपणामुळें मराठ्यांना आपली स्वतःची दुकाने विकून बाहेर जावे लागले.
आता भाजप चे सरकार आहे BMC मध्ये म्हणून कदाचित हे शक्य झाले असेल
Comments are closed.