Home ब्रेकिंग न्यूज Devendra Fadanvis : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन

Devendra Fadanvis : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन

0
Devendra Fadanvis : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जन्मस्थळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अभिवादन

सातारा दि. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुल भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी आदी उपस्थित होते.

https://prahaar.in/2026/01/03/former-director-general-of-police-rashmi-shukla-paid-a-courtesy-visit-to-the-chief-minister/

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या असणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातून हजारो लोक नायगाव येथे दाखल झाले आहेत. त्यांच्या स्वागतासाठी नायगावनगरी सडा रांगोळीने सज्ज झाली आहे.