मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने उमेदवारी माघार घेण्याच्या मुदतीत म्हणजेच शुक्रवारी २ जानेवारी २०२६ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण ४२३ उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आली आहे. तर, १ हजार ७०० उमेदवार निवडणूक लढविण्यास सज्ज आहेत यात ८२१ महिला आणि ८७९ पुरुष उमेदवारांचा समावेश आहे. शनिवारी ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून निवडणूक चिन्ह नेमून दिली जाणार आहेत. तसेच, शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम प्रसिद्ध केली जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांनी जाहीर केलेल्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या कार्यक्रमानुसार, मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ ते मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजीपर्यंत एकूण ११ हजार ३९१ नामनिर्देशनपत्रांचे वितरण झाले.
नामनिर्देशनपत्र स्वीकारण्याच्या अंतिम दिवसापर्यंत म्हणजेच मंगळवार, ३० डिसेंबर २०२५ रोजी एकूण २ हजार ५१६ नामनिर्देशन अर्ज दाखल झाले. प्राप्त २ हजार ५१६ नामनिर्देशनपत्रांची बुधवार, ३१ डिसेंबर २०२५ रोजी छाननी करण्यात आली. १६४ नामनिर्देशन पत्रे छाननीत अवैध ठरली. तर उर्वरित २ हजार २३१ उमेदवारी अर्ज पत्रे वैध ठरले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत शुक्रवार, दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत होती. या निर्धारित कालावधीत ४५३ उमेदवारांनी अर्ज घेण्यात आले या माघारी अंती स्पष्ट झालेल्या चित्रानुसार, १ हजार ७०० उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
शनिवार ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेपासून उमेदवारांना निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येणार आहे. चिन्ह वाटप पूर्ण झाल्यानंतर निवडणूक लढविणा-या उमेदवारांची अंतिम यादी शनिवार, ३ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
माघार घेतलेल्या / निवडणूक लढविणा-या उमेदवारांची संख्या
ए + बी + ई विभाग – १९ /९२
सी + डी विभाग – ०५ / ४४
एफ दक्षिण विभाग – २१ / ५०
जी दक्षिण विभाग – १४ / ५१
जी उत्तर विभाग – १८ / १०९
एफ उत्तर विभाग – २५ / ९३
एल विभाग – २० / ७६
एल विभाग – २४ / ७४
एम पूर्व विभाग – ४१ / १२१
एम पूर्व + एम पश्चिम – ४४ / ९७
एन विभाग ( – ३४ / ८८
एस विभाग – १५ / ७०
टी विभाग – २४ / ७९
एच पूर्व विभाग – २५/ ८७
के पूर्व + एच पश्चिम विभाग – १२ / ५८
के पश्चिम विभाग + के पूर्व – १८ / ८२
के पश्चिम विभाग – १८ / १०४
पी दक्षिण विभाग – १४ / ५६
पी पूर्व विभाग – २१ / ८१
पी उत्तर विभाग – ११ / ६०
आर दक्षिण विभाग – १० / ८३
आर मध्य विभाग – ०७ / ३५
आर उत्तर विभाग – १३ / ३९
एकूण – ४२३/ १७००