मुंबई : मुंबई महापालिकेसाठी आम आदमी पार्टीने अर्थात ‘आप‘ने ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिकेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंतची मुदत आहे. यामुळे मुंबई मनपासाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.
https://prahaar.in/2025/12/28/ncp-announces-first-list-of-37-candidates-in-mumbai/
राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई मनपासाठी ३७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तसेच समाजवादी पक्षाने २१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. मुंबई महापालिकेत नगरसेवकांच्या एकूण २२७ जागा आहेत. या सर्व जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी आणि निकाल आहे.
https://prahaar.in/2025/12/27/samajwadi-partys-first-list-for-mumbai-municipal-corporation-announced-21-candidates-announced/
आम आदमी पार्टीच्या ५१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर


