मुंबई : एक कोटीहून अधिक घरांच्या भिंतीवर विराजमान असलेले ‘कालनिर्णय’ हे सुमंगल प्रकाशनाद्वारे मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी, कन्नडा, तमिळ आणि तेलुगू या सात भाषांमध्ये प्रकाशित झाले आहे. पंचांग, भविष्य, सणवार, तिथी नक्षत्रे, शास्त्रार्थ ही ‘कालनिर्णय ‘ची प्रमुख अंगे असून पंचांग जनसामान्यांसाठी सोपे व सुलभ करण्याचा सांस्कृतिक ‘रिफॉर्म’ ‘कालनिर्णय’ने पन्नास वर्षांपूर्वीच केला.
समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून, वेगवेगळ्या धाटणीचा ग्राहकवर्ग डोळ्यांसमोर ठेवून त्यानुसार छान छोटे कालनिर्णय, मॅग्नेट, श्री स्वामी समर्थ अवधूत पंचांग, नोटपॅड, स्वादिष्ट, आरोग्य, मोठे ऑफिस (मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती), छोटे ऑफिस (मराठी, इंग्रजी), मीडिअम (मराठी, इंग्रजी), थ्री इन वन क्युबिकल, कार (मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी), डेस्क (मराठी, हिंदी, गुजराती, इंग्रजी), मिनी, मायक्रो, वर्षचंद्रिका, मंथली प्लॅनर, स्लिम ब्ल्यू नोट फोर्टनाइटली प्लॅनर, स्लिम रेड नोट मंथली प्लॅनर व इयर प्लॅनर अशा विविध प्रकारांतील आवृत्त्या प्रकाशित केल्या आहेत. देशातील पहिली वेबसाइट, ॲप अशा उपक्रमांद्वारे ‘कालनिर्णय’ नेहमीच काळाबरोबर चालत आले आहे.
विविध उपक्रमांद्वारे ५० वर्षांहून अधिक काळापासून ‘कालनिर्णय ‘ने मराठी माणसावरच नव्हे, तर भारतीय मनावर आपला सांस्कृतिक ठसा नक्कीच उमटवला आहे. ‘कालनिर्णय’ हे जगातील सर्वाधिक खपाचे प्रकाशन आहे हे आपणास ज्ञात आहेच आणि हा बहुमान ‘कालनिर्णय ‘ला ‘ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्युलेशन’ (ABC*) या आंतरराष्ट्रीय संस्थेने दिला आहे. ‘कालनिर्णय’ने लोकांच्या गरजा लक्षात घेऊन उपयुक्त प्रकाशने वेळोवेळी उपलब्ध करून दिली आहेत.