Home महाराष्ट्र कोकण Mumbai Goa Highway : अरे बाप रे! मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Mumbai Goa Highway : अरे बाप रे! मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद

Mumbai Goa Highway : अरे बाप रे! मुंबई गोवा महामार्ग वाहतुकीसाठी बंद

माणगाव : मुंबईकडून माणगावकडे येणा-या मार्गावर माणगाव येथील कळमजे माणगाव ब्रीज कमकुवत झाल्याने १९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे माणगाव परिसरात वाहतूक कोंडीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वाहतुकीमध्ये महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.

माणगावजवळील कळमजे गावाजवळील पुलावरून पाणी वाहू लागल्याने पुलाला तडे गेले आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. त्यामुळे माणगाव-महाड-पोलादपूर तसेच तळकोकणाकडे जाणारी वाहतूक कोलाड-भिरा फाटा-सुतारवाडी-विले-जावठा-निजामपूर मार्गे वळविण्यात आली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

https://prahaar.in/2025/08/19/important-decisions-of-the-state-cabinet-announcements-regarding-health-and-land-use/

दरम्यान, सततच्या पावसामुळे रोहा तालुक्यातील नद्या-नाले ओसंडून वाहू लागले असून काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनचालकांना तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सतत दक्ष राहून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सोमवारी रात्रीपासून मंगळवारी पहाटेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) वर अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.