Home ताज्या घडामोडी मोनोरेल सेवेला अडथळा, वडाळा-चेंबूर मार्गावर सेवा सुरू

मोनोरेल सेवेला अडथळा, वडाळा-चेंबूर मार्गावर सेवा सुरू

मोनोरेल सेवेला अडथळा, वडाळा-चेंबूर मार्गावर सेवा सुरू

मुंबई: मुंबईतील मोनोरेल सेवेत आज काही प्रमाणात बिघाड झाल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. मैसूर कॉलनी स्टेशनजवळ एका मोनोरेल गाडीत किरकोळ तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोनोरेल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, वीज पुरवठ्यामध्ये (power supply) काही समस्या निर्माण झाली होती. प्रशासनाचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून, दुरुस्तीचे काम वेगाने सुरू आहे.

https://prahaar.in/2025/08/19/heavy-rains-in-vasai-virar-local-services-disrupted-between-vasai-and-virar-flood-situation-in-the-city/

सध्या वडाळा ते चेंबूर दरम्यानची मोनोरेल सेवा एकाच मार्गावर सुरळीत सुरू आहे. प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले असून, प्रवाशांची सुरक्षा ही आपली प्राथमिकता असल्याचे स्पष्ट केले आहे. लवकरच सेवा पूर्ववत केली जाईल, असेही प्रशासनाने सांगितले.