लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताचा पहिला डाव २२४ धावांत आटोपला. इंग्लंडला भारताचे सर्व फलंदाज बाद केले. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात आलेल्या इंग्लंडने दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत एक बाद १०९ धावा केल्या. सध्या इंग्लंड ११५ धावांनी पिछाडीवर आहे. झॅक क्रॉली आणि ऑली पोप खेळत आहेत. भारताच्या आकाशदीपने बेन डकेटला बाद केले. बेन डकेट ४३ धावा करुन ध्रुव जुरेलकडे झेल देऊन परतला.
याआधी भारताने पहिल्या डावात सर्वबाद २२४ धावा केल्या. भारताकडून करुण नायरने सर्वाधिक ५७ धावा केल्या.भारताला ३८ अवांतर चेंडूंचा फायदा मिळाला. यशस्वी जयस्वाल २, केएल राहुल १४, साई सुदर्शन ३८, कर्णधार शुभमन गिलने (धावचीत) २१, रविंद्र जडेजाने ९, यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने १९, वॉशिंग्टन सुंदरने २६ धावांचे योगदान दिले. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा शून्य धावा करुन बाद झाले तर आकाशदीप शून्य धावांव नाबाद राहिला. भारताकडून करुण नायर आणि साई सुदर्शन हे दोनच फलंदाज दीर्घकाळ मैदानावर पाय रोवून उभे होते. इंग्लंडकडून गस अॅटकिन्सन पाच, जोश टंगने तीन आणि ख्रिस वोक्सने एक बळी बळी घेतला.
Lunch on Day 2 of the fifth Test at the Oval 🏟️
England 109/1 in the 1st innings, trail by 115 runs
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWNayE#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/uPyCbxPgmR
— BCCI (@BCCI) August 1, 2025