Home ब्रेकिंग न्यूज Yogesh Kadm : भायखळामधील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सचिन कुर्मी हत्या प्रकरणात SIT चौकशी होणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा

Yogesh Kadm : भायखळामधील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सचिन कुर्मी हत्या प्रकरणात SIT चौकशी होणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा

0
Yogesh Kadm : भायखळामधील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सचिन कुर्मी हत्या प्रकरणात SIT चौकशी होणार; गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची घोषणा

मुंबई : भायखळा येथील राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख सचिन कुर्मी हत्या प्रकरणात आज विधानसभेत पंकज भुजबळ यांच्याकडून विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करण्यात आला. सचिन कुर्मी हत्या प्रकरणात प्रमुख आरोपींची चॊकशी अजुन करण्यात आलेली नाही आहे. त्यावेळी कूर्मींच्या मुलाला देखील काॅलेजमध्ये जाताना धमकवण्यात आले. सीडीआर रिपोर्ट तपासला गेला नाही, पोलिसांच यात काहीतरी साटलोटं आहे. यावेळी पंकज भुजबळ यांनी पोलिसांवर आरोप केल्याचं पाहायला मिळालं. या प्रकरणी लक्ष घालून SIT कडून चॊकशी होउन कारवाई व्हावी अशी मागणी पंकज भुजबळ यांनी अधिवेशनात केली आहे.

https://prahaar.in/2025/07/10/anil-parab-and-shambhuraj-desai-clash-in-the-legislative-council-over-the-issue-of-marathi-people/

यावर उत्तर देताना गृहमंत्री योगेश कदम म्हणाले की, आपण यात येऊन सहा आरोपीना पकडलं आहे. मकोका लावला आहे. आर्थिक वादातून ही घटना घडली..बाकीच्या आरोपींचीदेखील यात नाव घेतली. पण त्यांची नाव आरोपी म्हणून आढालाल नाही..पण आपण सखोल चौकशी करु Cdr आणि बाकी गोष्टी तपासायला लाऊ..

https://prahaar.in/2025/07/10/anil-parab-and-shambhuraj-desai-clash-in-the-legislative-council-over-the-issue-of-marathi-people/

अंबादास दानवे म्हणाले, ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्याआधी सचिन कुर्मीला आरोपींनी धमकी दिली, तुला वर पाठवतो अशी धमकी दिली. पण बाकीचे कोण होते तर राजकीय शत्रू होते. बाकीच्यांवर कारवाई झाली नाही कारण त्या ठिकाणी पोलिसांना फोन गेले..भायकाळा आणि लालबाग परिसरात ही गँग देखील आहे.. आणि ज्यांच्यावर हल्ला झाला त्याचे कुटुंबीय घाबरलेले आहेत..

गृहराज्यमंत्री योगेश कदम पुध्ये उत्तर देत म्हणाले, या आधीच त्यांना चौकशीला बोलावलं होता सचिन कुर्मी हत्या प्रकरणात SIT गठीत करुन चॊकशी केली जाणार. कोणालाही सोडणार नाही.. ग्रुहराज्यमंत्री योगेश कदम यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा केली.