Home ब्रेकिंग न्यूज दुसऱ्या राज्यात भाषेवरुन मराठी माणसांना मारलं तर ? हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंना सवाल

दुसऱ्या राज्यात भाषेवरुन मराठी माणसांना मारलं तर ? हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंना सवाल

0
दुसऱ्या राज्यात भाषेवरुन मराठी माणसांना मारलं तर ? हिंदुस्तानी भाऊचा राज ठाकरेंना सवाल

मुंबई : मराठी भाषेचा अपमान केल्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये एका हॉटेल व्यावसायिकाला मारहाण झाली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला. या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्तानी भाऊ याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना प्रश्न विचारणारा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पण व्हायरल होत आहे.

मराठी भाषेवरून आपल्याच हिंदू लोकांना मारणं चुकीचं असल्याचं हिंदुस्तानी भाऊ याने व्हिडीओतून सांगितले आहे.

‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन नगरीमध्ये, या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा हा गौरवाचा, अभिमानाचा विषय आहे. पण मराठी भाषेवरुन राज्यात परराज्यांतून आलेल्यांना मारहाण करणे चुकीचे आहे. शाळा असो किंवा कॉलेज.. तिथे मराठी भाषा शिकवलीच पाहिजे. यासाठी जेवढी ताकद तुम्हाला लावायची आहे, ती लावा. पूर्ण हिंदू समाज तुमच्यासोबत आहे. पण गरिबांना मारणं चुकीचं आहे. आज महाराष्ट्रातील अनेक मराठी लोक दुसऱ्या राज्यात शिकायला, नोकरी करायला गेले आहेत. तिथली लोकंही बघतात की आपल्या लोकांना मारलं जातंय. जर त्या लोकांनी तिथे मराठी लोकांसोबत असं केलं, तर आपण काय करणार? एखाद्याला मारणं खूप सोपं असतं, पण एकत्र आणणं खूप अवघड असतं,’ असं हिंदुस्तानी भाऊ व्हिडीओत म्हणत आहे.

‘बाळासाहेबांनंतर त्यांची एक सावली म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुम्ही हिंदुत्वासाठी बोला. प्रत्येक शाळेत, कॉलेजमध्ये मराठी भाषा शिकवलीच पाहिजे, बोललीच पाहिजे. पण गोरगरीबांना मारून, त्यांना जबरदस्ती करून.. तुम्ही आपल्या हिंदुत्वाला लांब करताय. ते पण हिंदूच आहेत. तुमच्यापासून ते लोक लांब जात आहेत. राजकारण करा पण आज तुम्हा राजकारण कोणासोबत करताय? ज्या लोकांनी बाळासाहेबांचा सन्मान नाही केला, काँग्रेससोबत जाणाऱ्यांशी तुम्ही आज युती करून बसला आहात. जे श्रीरामांबद्दल चुकीचं बोलले, त्यांच्यासोबत तुम्ही युती करणार का? हिंदू समाज तुमच्याकडे खूप अपेक्षेनं बघतोय, त्यांचा विश्वास तोडू नका. मनसैनिकांनाही विनंती करतो की, तेसुद्धा हिंदू आहेत, त्यांना नका मारू. आपल्या लोकांना मारू नका;’ असंही हिंदुस्तानी भाऊ व्हिडीओत म्हणत आहे.