नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू उद्घाटनाची तारीख अद्यापही निश्चित झाली नाही. परंतू विमानतळाचा वापर करणाऱ्या प्रवाशांना युजर डेव्हलमेंट फीस भरावी लागणार आहे. हे आधीच निश्चित करण्यात आले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १२२५ रुपयांपर्यंत यूजर डेव्हलपमेंट फीस आकारण्यास विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाने मान्यता दिली.
यूजर डेव्हलोपमेंट फीस कोणत्या प्रवाशांना भरावी लागणार आहे ?
यूजर डेव्हलपमेंड फीस एक प्रकारचा शुल्क आणि ते प्रवाशांना विमानतळाचा वापर करण्यासाठी द्यावी लागणार आहे. हे शुल्क २०२५ – २०२६ साठी निश्चित करण्यात आले. विमानतळ सुरु झाल्यानंतर शुल्क धोरण तयार केले जाईल. त्यानंतर या शुल्कात बदल होण्याची शक्यता आहे.
प्रवाशांना देशांतर्गत उड्डाणांसाठी ६२० रुपये आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी १,२२५ रुपये यूजर डेव्हलपमेंट फीस म्हणून द्यावे लागणार आहे.