मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने प्रवाशांच्या सुरक्षिततेला आणि सोयीला प्राधान्य देण्यासाठी उपनगरीय गाड्यांच्या प्रथम श्रेणी डब्यांमध्ये तिकीट तपासणी मोहीम राबविली जाणार आहे . ही नवीन मोहीम सोमवार, १६ जून पासून राबविण्यात येईल.
https://prahaar.in/2025/06/15/ndrf-sdrf-teams-on-alert-for-relief-work-in-case-of-emergency-in-the-state/
प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये अनधिकृत प्रवासाच्या वारंवार तक्रारी लक्षात घेता, मुंबई विभागाचे विशेष तिकीट तपासणी पथक, रेल्वे संरक्षण दल (RPF) सोबत, गर्दीच्या वेळी सर्व प्रथम श्रेणीच्या डब्यांमध्ये एंड-टू-एंड आधारावर (संपूर्ण प्रवासादरम्यान) रोटेशनल आधारावर तैनात केले जाईल. हे पथक संपूर्ण प्रवासात डब्ब्यांची कसून तपासणी करतील. वैध प्रथम श्रेणीचे तिकीट नसलेल्या प्रवाशांना ट्रेनमध्ये दंड आकारला जाईल. जर पैसे न भरल्यास, अशा प्रवाशांना पुढील नियुक्त केलेल्या स्थानकावर सोडले जाईल जिथे स्टेशन आधारित तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांकडून पुढील कारवाई केली जाईल आणि आवश्यकता असल्यास कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल.