Home ताज्या घडामोडी दिल्ली: जनपथ रोडवरील सीसीएस इमारतीला आग

दिल्ली: जनपथ रोडवरील सीसीएस इमारतीला आग

0
दिल्ली: जनपथ रोडवरील सीसीएस इमारतीला आग

नवी दिल्ली : जनपथ रोडवरील सीसीएस इमारतीत आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तेरा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेत जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. आग विझवल्यानंतर नियमानुसार चौकशी केली जाईल, असे अग्निशमन दलाने सांगितले.