Home ताज्या घडामोडी चर्चगेट स्टेशनवर मोंजिनीस शॉपला आग, प्रवाशांमध्ये खळबळ!

चर्चगेट स्टेशनवर मोंजिनीस शॉपला आग, प्रवाशांमध्ये खळबळ!

चर्चगेट स्टेशनवर मोंजिनीस शॉपला आग, प्रवाशांमध्ये खळबळ!

मुंबई : चर्चगेट रेल्वे स्थानकात गुरुवारी सायंकाळी एक भीषण घटना घडली. स्टेशनच्या आत असलेल्या ‘मोंजिनीस केक शॉप’ मध्ये अचानक आग लागली, ज्यामुळे काही वेळासाठी प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

ही आग सायंकाळी ५:२७ वाजता लागली असून, चर्चगेट कॉन्कोर्स परिसरातील एका स्टॉलमध्ये ही दुर्घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक वॉर्ड कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

पश्चिम रेल्वेच्या अधिकृत माहितीनुसार, सतर्क कर्मचाऱ्यांनी लगेच अग्निशामक यंत्रांचा वापर करून अवघ्या पाच मिनिटांत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही.

सध्या चर्चगेट स्थानकावर गाड्यांची वाहतूक सुरळीत सुरू आहे आणि परिसरातली परिस्थिती नियंत्रणात आहे. वेळेवर हस्तक्षेप झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. या प्रकरणी अधिक चौकशी सुरु आहे.