नवी मुंबई : नवी मुंबईतील महापालिकेच्या घणसोली NMMT बस डेपोतील बसेसना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तीन बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. आगीची माहिती मिळताच महापालिकेच्या कोपरखैरणे आणि ऐरोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी उशिराने पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण त्यापूर्वीच ३ बसेस पूर्णपणे जळून गेल्या होत्या. आज सकाळी ०७ वाजताच्या सुमारास ही आगीची घटना घडली.
https://prahaar.in/2025/06/03/rcb-vs-pbks-ipl-2025-rcb-seals-first-title-after-17-years-beats-punjab-by-6-runs/
या आगीत ३ बसेस पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तर लागलेल्या आगीचे नेमके कारण मात्र कळलेलं नाही. बस डेपोमधील काही सतर्क कर्मचाऱ्यांमुळे त्वरित अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने जीवितहानी टळली आहे. चालक वाहकांनी आरडाओरड केल्याने आजूबाजूला इतर उभ्या असलेल्या बस बाजूला घेऊन जाण्यात यश आले आणि मोठी वित्तहानी टळली.