Home महाराष्ट्र कोकण Mumbai-Goa highway : कशेडी घाटात भेगा, नव्या मुंबई-गोवा महामार्गावर भूस्खलनाचा धोका वाढला

Mumbai-Goa highway : कशेडी घाटात भेगा, नव्या मुंबई-गोवा महामार्गावर भूस्खलनाचा धोका वाढला

Mumbai-Goa highway : कशेडी घाटात भेगा, नव्या मुंबई-गोवा महामार्गावर भूस्खलनाचा धोका वाढला

पोलादपूर : जुन्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरील कशेडी घाटात भेगा पडल्याने आणि मंगळवारी सायंकाळी खेड तालुक्याच्या हद्दीत भुयारी मार्गावर मोठमोठे दगड कोसळल्याने नव्या महामार्ग क्रमांक ६६ वर भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.

कोंढवी फाट्याजवळ जुन्या महामार्गावर भेगा पडलेल्या ठिकाणी संभाव्य धोक्याची सूचना देणाऱ्या पताका लावण्यात आल्या असून, वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या भेगांमुळे जुना महामार्ग खचून तो थेट नव्या महामार्गावर कोसळण्याची शक्यता आहे.

https://prahaar.in/2025/05/29/man-tried-to-suicide-by-setting-fire-with-petrol-in-front-of-maharashtra-cm-devendra-fadnavis-house-varsha-in-mumbai/

दरम्यान, कातळी भोगावच्या हद्दीत भुयारी मार्ग पूर्ण होताच, रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीत चार ते सहा मोठे दगड पडल्याचे मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी माहिती दिली.

या पार्श्वभूमीवर जुना रस्ता तातडीने फोडून संरक्षक उपाययोजना केल्या नाहीत, तर नव्या महामार्गावरील वाहतूक ठप्प होण्याचा धोका आहे. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.