Home ब्रेकिंग न्यूज ‘व्हाट द हेल?’ – ट्रम्प भडकले! रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, कीव शहराचे मोठे नुकसान

‘व्हाट द हेल?’ – ट्रम्प भडकले! रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, कीव शहराचे मोठे नुकसान

‘व्हाट द हेल?’ – ट्रम्प भडकले! रशियाचा युक्रेनवर सर्वात मोठा हवाई हल्ला, कीव शहराचे मोठे नुकसान

वॉशिंग्टन : रशियाने पुन्हा एकदा युक्रेनवर जबरदस्त हवाई हल्ला चढवला आहे. २९८ क्षेपणास्त्रे आणि ६९ ड्रोनच्या साहाय्याने झालेल्या या हल्ल्यात किमान १२ नागरिकांचा मृत्यू झाला. यामुळे युक्रेनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कीव शहराचे मोठे नुकसान झाले आहे.

या हल्ल्यावर माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून त्यांनी थेट म्हटलं, “व्हाट द हेल? हे योग्य नाही! पुतीन हे क्रेझी व्यक्ती आहेत!” ट्रम्प म्हणाले, “मी त्यांना ओळखतो, आमचं नातं चांगलं होतं, पण आता ते रॉकेट्स डागत आहेत. हे थांबायलाच हवं.”

https://prahaar.in/2025/05/25/pakistani-president-asif-ali-zardaris-daughter-aseefas-convoy-attacked-during-protest-against-canal-project-on-sindh-river/

युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की, त्यांनी ४५ क्षेपणास्त्रे आणि २६६ ड्रोन हवेतच नष्ट केले आहेत. तरीही रशियाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे.

ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्यावरही टीका करत, “त्यांची बोलण्याची शैली देशाचे भले करत नाही, हे युद्ध थांबायला हवं,” असं म्हणत थेट टोला लगावला.