मुंबई : भारतीय क्रिकेट संघांचे दोन दिग्गज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. यापूर्वीच या दोघांनी टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही निवृत्ती घेतली आहे आणि ते फक्त वनडे सामने खेळणार आहेत. अशा परिस्थितीत, त्यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टच्या श्रेणीत बदल होईल का? हा प्रश्न पुढे आला आहे. यावर बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी विराट आणि रोहित यांच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट श्रेणीबाबत मोठी अपडेट दिली आहे.
बीसीसीआयचे सचिव सैकिया म्हणाले की, ‘रोहित शर्मा, विराट कोहली यांनी जरी टी-२० आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असली तरी ते अजूनही भारतीय क्रिकेटचा भाग आहेत, त्यांना ग्रेड ए+ च्या सर्व सुविधा मिळतील.’ यामुळे हे स्पष्ट होते की, दोघांच्या पगारात कोणतीही कपात होणार नाही. दोघांनाही बीसीसीआयकडून प्रति वर्ष सात कोटी रुपये मिळत राहतील.
https://prahaar.in/2025/05/14/cabinet-approves-indias-sixth-and-ups-first-semiconductor-unit-2000-jobs-will-be-available/
बीसीसीआयने एप्रिलमध्ये सेंट्रल कॉन्ट्रॅक्टची नवी यादी जाहीर केली होती. या यादीत बीसीसीआयने ३४ खेळाडूंचा समावेश केला, ज्यात इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांचे कमबॅक झाले. ही करार यादी १ ऑक्टोबर २०२४ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी असणार आहे.
बीसीसीआय फक्त अशा खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समाविष्ट करते ज्यांनी एका वर्षात किमान ३ कसोटी, ८ एकदिवसीय सामने किंवा १० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जर एखादा खेळाडू कसोटी खेळत नसेल पण एकदिवसीय आणि टी-२० खेळत असेल तर त्याला कॉन्ट्रॅक्टचा भाग बनले जाते.