Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीAttack on Hindu : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात, विरोधी पक्षनेत्याचे राज्यपालांना...

Attack on Hindu : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात, विरोधी पक्षनेत्याचे राज्यपालांना पत्र

माल्दा : पश्चिम बंगालमधील माल्दामध्ये हिंदू संकटात आहेत. हिंदूंच्या मालमत्तांना लक्ष्य करुन हल्ले करणे, हिंदूंना घाबरवणे असे प्रकार सुरू आहेत. प्रामुख्याने हिंदूंच्या वाहनांना आणि दुकानांना लक्ष्य केले जात आहे. हिंदूंच्या रक्षणासाठी तातडीने माल्दामध्ये केंद्रीय सुरक्षा पथकांना बोलवावे, अशी मागणी करणारे पत्र पश्चिम बंगालचे विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांना लिहिले आहे. माल्दा जिल्ह्यातील मोथाबारीमध्ये हिंदूंना लक्ष्य करण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे मोथाबारीमध्ये तातडीने केंद्रीय सुरक्षा पथकांना नियुक्त करावे, अशीही मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपाल सी. व्ही. आनंदा बोस यांच्याकडे केली आहे. राज्यपालांनी केंद्रीय सुरक्षा पथके नियुक्त करण्यासाठी पश्चिम बंगाल सरकारला आवश्यक ते निर्देश द्यावे; अशी मागणी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केली आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठात ममता बॅनर्जींच्या भाषणावेळी ‘परत जा’ अशी घोषणाबाजी

याआधी केंद्रीय शिक्षणमंत्री आणि पश्चिम बंगाल भाजपाचे अध्यक्ष सुकांत मुजुमदार यांनी गुरुवारी संध्याकाळी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. व्हिडीओ पोस्ट करुन मालदा जिल्ह्यातील मोथाबारी येथे हिंदूंवर हल्ला झाल्याचे सुकांत मुजुमदार म्हणाले. या घटनेनंतर लगेच दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी राज्यपालांना पत्र लिहिले. ममता बॅनर्जींचे सरकार मुसलमानांचे लांगुलचालन करण्यात मग्न आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.

Bank Holiday : बँकेची ईदची सुट्टी रद्द; ३१ नव्हे ‘या’ तारखेला राहणार बँका बंद!

पश्चिम बंगालचे पोलीस ममता बॅनर्जी सरकारचे आदेश पाळत असल्यामुळे मुसलमानांनी काहीही केले तरी मूग गिळून गप्प बसतात. हिंदूंवर मुसलमान हल्ले करत असले तरी पोलीस हे हल्ले थोपवण्यासाठी ठोस उपाय करताना दिसत नाहीत. पश्चिम बंगाल सरकारचे वर्तन हिंदूंसाठी धोकादायक आणि राज्यातील कायदा – सुव्यवस्था बिघडवणारे असे आहे, अशी तक्रार सुवेंदू अधिकारी यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -