Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीUPI Payment Down : देशभरात यूपीआय सेवा ठप्प; युजर्सकर्त्यांमध्ये खळबळ! आज काय...

UPI Payment Down : देशभरात यूपीआय सेवा ठप्प; युजर्सकर्त्यांमध्ये खळबळ! आज काय होणार परिणाम?

नवी दिल्ली : बदलत्या काळानुसार सध्या अनेक लोक ऑनलाईन सेवांना (Online Payment) पहिले प्राधान्य देतात. गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा अनेक माध्यमातून ऑनलाईन पेमेंट करणे शक्य झाल्यामुळे नागरिक कॅश पेमेंट करण्यात टाळाटाळ करतात. मात्र ऑनलाईन पेमेंटवर अवलंबून असणाऱ्या अनेक नागरिकांना काल काही अडचणींचा सामना कारावा लागत होता. काल देशातील अनेक लोकांना UPI सेवेमध्ये समस्या (UPI Payment Down) आल्या. सध्या वापरात असलेले सर्व UPI अ‍ॅप्स जसे की PhonePe, Google Pay आणि Paytm काम करणे थांबवले गेले होते. यामुळे युजर्सकर्त्यांमध्ये खळबळ उडाली असून सर्व वापरकर्त्यांनी सोशल मीडियाद्वारे या समस्येवर संताप व्यक्त केला होता. दरम्यान, काही वेळानंतर यूपीआय सेवा सुरळीत चालू झाली. परंतु त्याचा परिणाम आजही होणार का, असा प्रश्न युजर्सकर्त्यांना पडत असताना याबाबत एनपीसीआयने (NPCI) या घटनेची पुष्टी केली आहे.

Gaurav Ahuja Pune : पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाची सुटका !

UPI सेवा का बंद झाली?

UPI सेवा ठप्प होताच NPCI (नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) ने त्यावर प्रतिक्रिया दिली. यासोबतच, लोकांना UPI सेवा वापरण्यात अडचणी का येतात हे देखील सांगण्यात आले. एनपीसीआयने त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर माहिती दिली की त्यांना अधूनमधून तांत्रिक समस्या येत आहेत. यामुळेच लोकांना फोनपे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या सेवा वापरण्यात अडचणी येत होत्या. यासह त्यांनी सांगितले की व्यवस्था स्थिर झाली आहे. लोकांना झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व, असेही एनपीसीआयने म्हटले.

आजही UPI सेवेवर परिणाम होईल का?

आज, गुरुवार, २७ मार्च रोजी, UPI सेवा पुन्हा व्यवस्थित काम करत आहे. तुम्ही फोनपे, गुगल पे आणि पेटीएम सेवा कोणत्याही अडचणीशिवाय वापरू शकता. याची पुष्टी करण्यासाठी, आम्ही वेगवेगळ्या UPI सेवांचा देखील वापर केला आहे, असे एनपीसीआयने सांगितले आहे.

UPI सेवा बंद पडल्यास काय करावे?

जर तुम्हाला UPI सेवा वापरण्यात समस्या येत असेल. म्हणून तुम्ही काही वेळाने पुन्हा प्रयत्न करू शकता. पण त्याआधी, NPCI च्या अधिकृत वेबसाइटला आणि UPI नियंत्रित करणाऱ्या बँकेला भेट द्या आणि UPI सेवेशी संबंधित अपडेट मिळवा. याशिवाय, अनेक बँका वापरकर्त्यांना एसएमएसद्वारे कळवतात की त्यांच्या सेवेवर परिणाम होऊ शकतो. अशा वेळी, कोणत्याही प्रकारची ऑनलाइन बँकिंग किंवा UPI सेवा वापरणे टाळा. जर UPI सेवा प्रभावित झाली तर तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आणि रोख रकमेचा वापर करून पेमेंट किंवा व्यवहार देखील करू शकता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -