पुणे : पुण्यात रस्त्याच्या बाजूला उभा राहून अश्लील वर्तन करणाऱ्या गौरव आहुजा बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. दि ८ मार्च रोजी पुण्याच्या शास्त्रीनगर जंक्शनवर बीएमडब्ल्यू कारमधून उतरुन सार्वजनिक ठिकाणी लघवी आणि अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गौरव अहुजाची अखेर जामीनावर सुटका होणार असल्याची बातमी समोर आली आहे.
Girgaon Gudi Padwa : अभिजात मराठीचा गौरव करत गिरगावकर करणार हिंदू नववर्षाचे स्वागत
८ मार्च रोजी पुण्याच्या शास्त्रीनगर जंक्शनवर गौरव अहुजाने लघवी केली. तसेच अश्लिल वर्तन करुन दाखवले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्या व्हिडिओमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर तो फरार होता. परंतु काही तासांतच गौरव आहुजाने एक व्हिडिओ प्रसारित करत घडल्या प्रकारावर माफी मागत, “मी आठ तासात पोलिसांसमोर हजर होईन” असं म्हटलं होतं. याप्रकरणी गौरव आहुजाच्या मित्राला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. मात्र आता तब्बल १७ दिवसांनी आरोपी गौरव अहुजाची जामिनावर सुटका होणार आहे. जामीन आदेशात असे म्हटले आहे की, आहुजाने सरकारी वकिलांच्या साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये असा इशारा देण्यात आला आहे. सोबतच, न्यायालयाची परवानगी घेतल्याशिवाय त्याने भारत सोडू नये असे निर्देश देण्यात आले आहेत. न्यायालयाने गौरव आहुजाला दर सोमवारी सकाळी ११ ते दुपारी २ च्या दरम्यान येरवडा पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश दिले आहेत.