मुंबई : प्रयागराजमध्ये होणाऱ्या महाकुंभमेळ्यादरम्यान, श्री जय जलाराम राम रोटी भंडार ट्रस्ट आणि नरसिंह स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्या रतौडी यांच्या नेतृत्वाखाली पाच बसेसमधून शेकडो लोक सोमवारी प्रयागराजला रवाना झाले,जिथे गंगा आणि यमुनेच्या संगमावर पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक केला जाईल.
सूर्या रतौडी यांनी कांदिवली पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक संस्थेतर्फे भाविकांसह करण्याचा निर्णय घेतला.
Mumbai-Pune Expressway Hotel : मुंबई – पुणे एक्स्प्रेसवेवरील हॉटेलचे सांडपाणी पातळगंगा नदीत
बस सोडण्यापूर्वी माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी पत्रकारांना सांगितले की,भाजपशी संबंधित धर्मानंद रतौडी यांचे पुत्र सूर्य रतौडी दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नवीन पद्धतीने कार्यक्रम आयोजित करतात. या वर्षी प्रयागराजमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अभिषेक केले जाणार आहे,ज्यामध्ये गुजराती,उत्तर भारतीय आणि मराठी भाषिक लोकांना सोबत घेतले जात आहे. शिवाजी महाराजांच्या तिथल्या स्नानाचे सार असे आहे की संपूर्ण महाराष्ट्र आणि देशाने स्नान केल्याचे समाधान मिळेल.