Home ताज्या घडामोडी Mumbai Metro : मुंबई मेट्रो मार्ग ५, ठाणे-भिवंडी-कल्याणच्या कामात तीन वर्षांची दिरंगाई

Mumbai Metro : मुंबई मेट्रो मार्ग ५, ठाणे-भिवंडी-कल्याणच्या कामात तीन वर्षांची दिरंगाई

0
Mumbai Metro : मुंबई मेट्रो मार्ग ५, ठाणे-भिवंडी-कल्याणच्या कामात तीन वर्षांची दिरंगाई

मुंबई  : मुंबई मेट्रो मार्ग ५, ठाणे- भिवंडी- कल्याण या प्रकल्पामध्ये स्थापत्य कामाच्या खर्चात सद्या तरी कोणतीही वाढ झाली नसली तरी ३ वर्षांची प्रकल्प दिरंगाई हा त्रासदायक आहे. आरटीआयच्या माध्यमातून आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी उघड केलेल्या या माहितीने एमएमआरडीएच्या मेट्रो प्रशासनातील हलगर्जीपणा आणि प्रकल्प व्यवस्थापनातील कमतरता यावर प्रकाश टाकला आहे.

https://prahaar.in/2025/02/17/mhada-ready-to-redevelop-13000-buildings-in-south-mumbai/

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेकडे विविध माहिती विचारली होती. मेट्रो प्रकल्प अंमलबजावणी शाखेने अनिल गलगली यांस सविस्तर माहिती दिली. मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे- भिवंडी- कल्याणचे काम अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला १ सप्टेंबर २०१९ रोजी देण्यात आले होते. मुंबई मेट्रो मार्ग- ५ ठाणे- भिवंडी- कल्याण ठाणे हा १५ स्थानके असलेला २४.९० किमी लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर आहे. सदर काम १ मार्च २०२२ रोजी पूर्ण करणे अपेक्षित होते. आता नवीन डेडलाईन ही ३१ मार्च २०२५ अशी आहे.