मुंबई : मुंबईतील मस्जिद बंदर येथील एका इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. आज सकाळी ही घटना घडली असून यामध्ये २ जणांचा मृत्यू झाला आहे.
Rohit Sharma : विसरभोळ्या हिटमॅनने पुन्हा केला घोटाळा; व्हिडीओ व्हायरल!
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजून ११ मिनिटांच्या सुमारास राम मंदिराजवळील वडगडी येथील इस्साजी स्ट्रीटवर असलेल्या पन्न अली मॅन्शन या १२ मजली निवासी इमारतीत आग लागली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले. तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आल्यामुळे आग विझवण्यात यश आले. मात्र आगीच्या धुरामुळे दोन महिलांना आपला जीव गमवावा लागला. साजिया आलम शेख (३०) आणि सबिला खातून शेख (४२) असे दोन्ही मृत महिलांची नावे आहेत.
दरम्यान, पन्न अली मॅन्शन इमारतीमधील ग्राउंड फ्लोअरवरील कॉमन मीटर बॉक्स आणि पॅसेजमधील इलेक्ट्रिक वायरिंग याठिकाणी ही आग लागल्याची माहिती मिळत आहे.