दुबई : भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy) स्पर्धेसाठी शनिवारी (१५ फेब्रुवारी) दुबईत पोहोचला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी दुबईच्या मैदानावर उतरणार आहे. टीम इंडिया दुबईला पोहचताना विमानतळावर एक मजेशीर किस्सा घडल्याचे पाहायला मिळाले. टीम इंडियाचा कर्णधार रोहितचा (Rohit Sharma) विसरभोळा स्वभाव पाहायला मिळाल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
काँग्रेस उपनेते गौरव गोगोईंच्या पत्नीचे पाकिस्तानच्या ISI शी कनेक्शन ?
दुबईच्या विमानतळावरचा रोहितचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात रोहित बसच्या दारावर उभा राहून कोणालातरी बोलावतोय. सपोर्ट स्टाफमधील एक सदस्य त्याच्याकडे धावून आला आणि रोहित त्याच्यासोबत गप्पा मारत होता. यावरून रोहित पुन्हा काहीतरी विसरला अशी खिल्ली उडवली जातेय. रोहितने स्वतःही यापूर्वी अनेकदा त्याच्या विसरभोळ्या स्वभावाची कबुली दिली आहे. हा व्हिडीओ आता वेगाने व्हायरलं होत आहे.
भारत २० फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. विराट कोहली, अष्टपैलू रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, केएल राहुल, फिरकीपटू कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती यांच्यासह अनेक प्रमुख खेळाडू कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासोबत दुबईत दाखल झाले. गंभीरसह स्टाफ सदस्य क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप, गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल आणि सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत हेही दाखल झाले आहेत.