Home ताज्या घडामोडी Central Railway : प्रवाशांसाठी विशेष सूचना! मध्यरेल्वेचा मेगाब्लॉक जाहीर

Central Railway : प्रवाशांसाठी विशेष सूचना! मध्यरेल्वेचा मेगाब्लॉक जाहीर

Central Railway : प्रवाशांसाठी विशेष सूचना! मध्यरेल्वेचा मेगाब्लॉक जाहीर

मुंबई : मध्यरेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी. उद्या ( दि.२) मध्य रेल्वेच्या माटुंगा आणि मुलुंड उपनगरीय विभागांवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे. या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे मात्र हाल होणार आहेत.

सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील, माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांवर थांबतील आणि १५ मिनिटे उशिराने त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचतील.

https://prahaar.in/2025/02/01/budget-2025-will-the-poor-and-middle-class-get-relief-from-finance-minister-sitharamans-announcement-today/

सकाळी ११.२५ ते दुपारी ३.२७ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान नियोजित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल दरम्यान हार्बर मार्गावर आणि ठाणे ते पनवेल दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक राहणार नाही

हे मेगा ब्लॉक्स पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.