Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीPandharpur Vitthal Temple : नवविवाहित जोडप्यांना मिळणार विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन!

Pandharpur Vitthal Temple : नवविवाहित जोडप्यांना मिळणार विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन!

पंढरपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी (Pandharpur Vitthal Temple) राज्यभरातून लाखो भाविक येतात. तसेच विवाह झाल्यानंतर नवविवाहित जोडपे देवदर्शनासाठी जात असतात. अशातच पंढरपुरातील विठुरायाचे दर्शनला जाणाऱ्या जोडप्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने नवविवाहित जोडप्यांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यामुळे लग्नानंतर विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांना दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही.

Siddhivinayak Temple : सिद्धिविनायक मंदिरात ड्रेसकोड!

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीमध्ये दिव्यांगांच्या बरोबरच नवविवाहित जोडप्यांना व्हीआयपी दर्शन देण्याचा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नवविवाहित जोडप्यांना विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या रांगेत उभे राहावे लागत होते. मात्र आता या निर्णयामुळे पंढरपूरमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या नवविवाहित जोडप्याला विठुरायाचे लागलीच व चांगले दर्शन घेता येणार आहे.

स्थानिक नागरिकांसाठीही वेळ निश्चित

त्याचबरोबर पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना देखील सकाळी सहा ते सात आणि रात्री दहा ते साडेदहा वाजेपर्यंत दर्शनाला सोडले जाणार आहे. अर्थात यामुळे दर्शनासाठी होणारी गर्दी कमी होऊ शकेल. याची अंमलबजावणी गुरुवारपासून म्हणजे २९ जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -