Home ताज्या घडामोडी Uttarakhand Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तराखंड हादरलं!

Uttarakhand Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तराखंड हादरलं!

Uttarakhand Earthquake : भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तराखंड हादरलं!

उत्तरकाशी : उत्तराखंडमधील उत्तरकाशी (Uttarakhand Earthquake) भागात आज सकाळी भूकंपाचे एकामागोमाग तीन धक्के बसले. भूकंपाचे धक्के सौम्य स्वरुपाचे असले तरीही यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://prahaar.in/2025/01/24/playing-with-students-lives-rat-feces-found-in-nutrition-food-in-sangola/

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ७ वाजून ४१ मिनिटांच्या सुमारास उत्तरकाशीमध्ये भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्यानंतर आणखी एक धक्का जाणवला आणि सकाळी ८ वाजून १९ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा तिसरा धक्का बसला. हा भूकंप ५ किमी खोलीवर भूगर्भात झाला असून या भूकंपाची तीव्रता ३.५ रिश्टर स्केल नोंदवण्यात आली आहे.