Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीPalghar Update : इअरफोनचे वेड विद्यार्थिनीच्या बेतले जीवावर!

Palghar Update : इअरफोनचे वेड विद्यार्थिनीच्या बेतले जीवावर!

पालघर : कॉलेज तसेच शाळकरी तरुण तरुणींमध्ये इअरफोनच्या माध्यमातून गाणी ऐकणे किंवा कॉलवर समोरच्याशी तासनतास बोलणे हे फॅड मोठ्या प्रमाणात वाढले असून हे वेड आता त्यांच्या जीवावरही बेतू लागले आहे. पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकाजवळील रेल्वे फाटकातून कानात इअरफोन घालून फाटक क्रॉस करणाऱ्या इयत्ता नववीमधील एका विद्यार्थिनीला एक्सप्रेस गाडीची धडक बसून आपले प्राण गमवावे लागल्याचा दुर्दैवी प्रकार गुरूवारी दुपारी घडला. वैष्णवी रावल राहणार माकणे, सफाळे (पश्चिम) असे मयत विद्यार्थिनीचे नाव आहे.

Mumbai : मुंबई हादरली! गोरेगावमध्ये २० वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार; गुप्तांगात सापडले ब्लेड आणि दगड

वैष्णवी ही सफाळे येथील इंग्लिश माध्यमाच्या शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत होती. गुरुवारी दुपारी साधारण एक ते दीडच्या सुमारास ती नेहमीप्रमाणे माकणे येथून सफाळे येथील ट्यूशनमध्ये जाण्यास निघाली. कानात इअरफोन घालून ती सफाळे स्थानकाजवळील बंद रेल्वे फाटक क्रॉस करत असताना फाटकातील महिला कर्मचारी तसेच अन्य नागरिकांनी आरडाओरड करुन थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र, इअरफोनमध्ये मग्न असणाऱ्या वैष्णवीला मुंबई दिशेने येणाऱ्या एक्सप्रेस गाडीची धडक बसली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. सायंकाळी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात तिच्यावर पोस्टमार्टम करण्यात आले. वैष्णवी ही एकुलती एक मुलगी असल्याने तिच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -