मुंबई : बदलापूर डोंबिवली नंतर आता मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतल्या स्टेशन परिसरात एका २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिच्या गुप्तअंगात ब्लेड आणि दगड लपवल्याची घटना घडली आहे. राम मंदिर स्टेशनच्या आवारात २० वर्षीय तरूणी बेशुद्ध अवस्थेत आढळली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास करण्यात येत आहे.
राम मंदिर स्टेशन परिसरात २० वर्षीय तरुणी बेशुद्ध अवस्थेत आढळली. तरुणीला मंगळवारी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या गुप्त अंगातील ब्लेड व दगड काढण्यात आले. शुद्धीत आल्यावर पोलिसांनी जवाब नोंदवला असून जवाबात एका रिक्षा चालकाने तिच्यावर बलात्कार केला असल्याचे तिने सांगितले.
Tooth and Dare Game : ‘टूथ अँड डेअर गेम तरुणीला भोवला’; गेम हरली आणि…
नराधम रिक्षाचालक एवढ्यावरच न थांबता त्याने पीडित मुलीच्या गुप्त अंगावर ब्लेडचे आणि सिझेरियन ब्लेड ने वार केले असल्याचं पीडितेने सांगितलं. दरम्यान पोलीस संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेत असून राम मंदिर स्टेशन आवारातील सिसिटीव्ही फुटेज तपासात आहेत अधिक माहितीसाठी इतर रिक्षाचालकांची कसून चौकशी करत आहेत.