मुंबई : तानसा पश्चिम जलवाहिनीवर पवई येथील जोगेश्वरी-विक्रोळी जोडरस्त्यावरील पुलाजवळ मोठी गळती लागल्याचे आज पहाटे आढळून आले. यामुळे जलवाहिनीचा पाणीपुरवठा तत्काळ बंद करण्यात आला आहे.
गळती दुरुस्तीचे काम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने हाती घेण्यात आले असून, या कामासाठी २४ तासांचा कालावधी लागणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
https://prahaar.in/2025/01/21/mega-block-on-mumbai-pune-expressway-for-three-days/
दुरुस्तीच्या काळात पवई ते धारावी दरम्यान जलवाहिनी बंद राहणार आहे. परिणामी, एस विभाग, के पूर्व विभाग, जी उत्तर विभाग आणि एच पूर्व या ४ विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद असेल.
पालिका प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन केले आहे. जलवाहिनीचे दुरुस्ती काम वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे.