जालना : आनंदासाठी आणि फिटनेससाठी मैदानी खेळ खेळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून तरुणाईला सतत दिला जातो. पण धकाधकीच्या जीवनात अनेकजण तब्येतीकडे दुर्लक्ष करतात. सकस आहाराऐवजी फास्टफूडवर जगतात. नियमित व्यायाम करणे टाळतात. यामुळे एखाद्या दिवशी नेहमीपेक्षा जास्त धावपळ झाली तरी हृदयावर ताण येतो. रक्तदाबात चढउतार सुरू होतात. श्वास घेण्यास त्रास होतो. या एरवी छोट्या दिसणाऱ्या समस्यांकडे वेळेत लक्ष दिले नाही तर काही वेळा या समस्या जीवघेण्या ठरतात. काहीसा असाच प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
View this post on Instagram
https://prahaar.in/2024/12/30/australia-won-by-184-runs-against-india-in-melbourne-test/
क्रिकेट खेळताना धाव काढून झाल्यावर दोन फलंदाज धावपट्टीवरच एकमेकांशी बोलत होते. नंतर एक फलंदाज फलंदाजीसाठी गेला तर दुसरा अर्थात नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज त्याच्या क्रिझच्या दिशेने जाऊ लागला. पण आधीचे श्रम त्याला त्रासदायक ठरले. तो क्रिझकडे जात असताना छातीत असह्य वेदना होऊ लागल्यामुळे खेळपट्टीवरच कोसळला. थोड्याच वेळात या खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. सहकारी खेळाडूंनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी तपासणी करुन खेळाडूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगितले. धक्कादायक बाब म्हणजे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालेल्या खेळाडूचे वय फक्त ३२ वर्षे एवढे होते. जालना शहरात एका क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळपट्टीवर त्याचा मृत्यू झाला.
https://prahaar.in/2024/12/30/updated-wtc-points-table-after-australia-won-by-184-runs-against-india-in-melbourne-test/
आयोजकांनी हृदयविकाराच्या झटका आलेल्या खेळाडूला रुग्णालयात नेले पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. अवघ्या ३२ वर्षांच्या उमद्या खेळाडूने प्राण गमावले होते.