Home देश Jaipur CNG Blast : अपघातग्रस्तांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर

Jaipur CNG Blast : अपघातग्रस्तांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर

0
Jaipur CNG Blast : अपघातग्रस्तांना पंतप्रधानांकडून आर्थिक मदत जाहीर

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेतील प्रत्येक मृताच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून २ लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाने एक्स या समाजमाध्यमावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

https://prahaar.in/2024/12/20/the-government-will-not-rest-until-such-bigots-are-brought-down-akhilesh-shukla-who-assaulted-a-marathi-family-is-suspended-says-chief-minister/

या पोस्ट मध्ये लिहलं आहे कि, “राजस्थानमध्ये जयपूर-अजमेर महामार्गावरील रस्ते अपघातात झालेल्या जीवितहानीबद्दल खूप दुःख झाले.आपल्या जिवलगांना गमावलेल्यांप्रती माझ्या शोकसंवेदना.जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो.स्थानिक प्रशासन मदत कार्य करत आहे.मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी २  लाख रुपयांची आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाईल.”